राजगड महेश सणस दि १९: पुणे जिल्ह्यातील विंझर गावातील एका अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला आज मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी तसेच विंझर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी श्री. संतोष अप्पा दसवडकर ,अध्यक्ष, पुणे जिल्हा मनसे आणि मनसे नेते श्री. अंकुश अण्णा दसवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, शिवसेनेचे युवा अध्यक्ष कु. योगेश दादा लिम्हण तसेच मनसे न युवा नेते संग्राम भैया दसवडकर यानीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
भूमीपूजन समारंभाला उपस्थित मान्यवर:
श्री. संतोष अप्पा दसवडकर (अध्यक्ष, पुणे जिल्हा मनसे)
श्री. अंकुश अण्णा दसवडकर (मनसे नेते)
कु. योगेश दादा लिम्हण (शिवसेना युवा अध्यक्ष)
श्री. सुशांत अण्णा भोसले (विंझर वी. का. सेवा सोसायटीचे माजी चेअरमन)
श्री. सदाशिव गायकवाड (विद्यमान चेअरमन)
सौ. नूतनताई गायकवाड (विद्यमान उपसरपंच)
श्री विनोद गायकवाड ( भीम संघर्ष सेना अध्यक्ष )
श्री. मोहन दसवडकर (ग्रामस्थ )
श्री राजाभाऊ लिम्हण (ग्रामस्थ व कार्यकर्ते)
श्री तुषार भोसले श्री.भाऊ मरगळे कैलास लिम्हण,श्री महेंद्रकाका फडके , श्री रमेश भोसले ,श्री शेख गुरुजी,श्री विलास भोसले ,श्री निलेश पवार ,श्री मनोज भोसले आणि यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान बोलताना श्री. संतोष अप्पा दसवडकर यांनी, “स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्यामुळे विंझरमधील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असून, दळणवळण अधिक सुलभ होईल,” असे मत व्यक्त केले. तसेच, श्री. अंकुश अण्णा दसवडकर आणि कु. योगेश दादा लिम्हण यांनीही रस्त्याचे काम दर्जेदार होण्यावर भर दिला आणि ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
या भूमिपूजनाच्या वेळी विंझर गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










