प्रतिनिधी : विलास धोंगडे, नसरापूर
भोर : शिवसेना (शिंदे गट) आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत कलात्मकतेला व सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा हेतू ठेवण्यात आला होता. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
1) जयश्री अमोल वाल्हेकर — पहिले बक्षीस (फ्रिज)
2) राजश्री प्रसाद वीर — दुसरे बक्षीस (टीव्ही)
3) अनिता प्रमोद लेकावळे — तिसरे बक्षीस (वॉशिंग मशीन)
4) सारिका चव्हाण — चौथे बक्षीस (आटा चक्की)
5) मनीषा संतोष बोरगे — पाचवे बक्षीस (मिक्सर)
स्पर्धकांनी पारंपरिकतेसह नवनवीन कल्पनांद्वारे सजावट सादर केली होती. सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
क्रांती धुमाळ यांचा समाजसेवा सन्मान
कार्यक्रमात समाजकार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल क्रांती धुमाळ यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शेतकऱ्यांना कृषी साहित्य वाटप, तसेच राजगड प्रीमियर लीग साठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
राजकारणाऐवजी समाजकार्यावर भर — शिवसेना नेते कुलदीप कोंडे
या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, जि.प. सदस्य कुलदीप कोंडे, तालुका प्रमुख दशरथ जाधव, अमोल पांगारे, विकास चव्हाण, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल धुमाळ सचिन बांदल आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे म्हणाले,
“राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने डीजे बंदीपासून ते हंडी, नवरात्र उत्सव आणि पालख्यांना अनुदान देण्यापर्यंत अनेक संवेदनशील आणि जनहितकारी निर्णय घेतले आहेत.”
कार्यक्रमात शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीला आणि विचारांना वंदन करण्यात आले.
शिवसेना नेते कुलदीप कोंडे म्हणाले,
“भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यास विकासाचा वेग अधिक वाढेल. शिवसेना हा पक्ष निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. समाजकार्य हेच आमचं ध्येय असून भोर तालुक्यातील कार्यकर्ते राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी काम करत आहेत. जनता आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही.”
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि आकर्षक पद्धतीने करण्यात आले होते. महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिक रंगतदार केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना बक्षिसे वितरित करताना उपस्थित मान्यवरांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले.










