आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा कहर; विहीरमध्ये ६५ भाविक जखमी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू


राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्यादरम्यान मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याने मोठी धावपळ उडाली. या घटनेत सुमारे ६५ भाविक व ग्रामस्थ जखमी झाले असून त्यांच्यावर वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विहीर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचा सांगता समारंभ असल्याने आज शेवटच्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेची पालखी संपूर्ण गावातून मोठ्या उत्साहात मिरवणुकीने काढण्यात आली. गावातील मंदिराजवळ पालखी पोहोचल्यावर ती जमिनीवर ठेवताच अचानक मधमाश्यांनी उपस्थित भाविकांवर हल्ला चढवला.

 

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. अनेकजण सैरावैरा पळू लागले. काहींनी मंदिरात आश्रय घेतला, तर काहींनी जवळील घरांमध्ये धाव घेत आपला बचाव केला. या पालखी सोहळ्यात सुमारे २०० हून अधिक भाविक सहभागी झाले होते.

 

हल्ल्यानंतर जखमींना तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. बहुतांश जखमींची प्रकृती स्थिर असून काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

 

दरम्यान, पालखी सोहळ्यादरम्यान काही लहान मुलांनी फटाके वाजवल्यामुळे मधमाश्या चिडून हल्ला केल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!