आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

म्हसोबाचीवाडीतील ज्येष्ठ महिलेच्या जमिनीचा कथित गैरव्यवहार; सहा जणांविरुद्ध गुन्हा


भिगवण | प्रतिनिधी सागर जगदाळे 

ता. इंदापूरमधील म्हसोबाचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या 80 वर्षीय महिलेची जमीन फसवणुकीने हडप केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणी भिगवण पोलीस ठाणे येथे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी गोदाबाई नानासाहेब चांदगुडे (वय 80, रा. म्हसोबाचीवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या वृद्धत्वाचा व अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत ‘शासकीय अनुदान मिळणार’ असे आमिष दाखवले. या बहाण्याने त्यांना बारामती येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेण्यात आले.

तेथे फिर्यादीच्या नावावर असलेली मौजे म्हसोबाचीवाडी येथील गट क्रमांक 517 मधील 29 आर जमीन आरोपी रमेश बबन चांदगुडे यांच्या नावावर नोंदवून घेतल्याचा आरोप आहे. या व्यवहारासाठी बाजारमूल्याच्या तुलनेत अत्यल्प अशी 2 लाख 40 हजार रुपयांची रक्कम फिर्यादीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.

तक्रारीत पुढे नमूद केल्यानुसार, जमा झालेली संपूर्ण रक्कम नंतर फिर्यादीचा नातू प्रितम पांडुरंग मंडलीक याने विश्वासात घेऊन बँकेत नेऊन काढून घेतली. हा कथित प्रकार 7 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत म्हसोबाचीवाडी, शेटफळगढे, घोलपवाडी तसेच बारामती येथील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात घडल्याचे FIR मध्ये नमूद आहे.

या प्रकरणात कुलदीप पोपट रकटे, ओम नागेश लोढे, मयूर बापू रसाळ आणि सागर दादा भिसे यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, भिगवण पोलीस सखोल तपास करत आहेत.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!