आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

खानापूर माजी विद्यार्थी संघातर्फे ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा खास शो; हेमंत ढोमे, अमेय वाघ यांचे विशेष कौतुक


प्रतिनिधी : शशिकांत जाधव

खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयच्या माजी विद्यार्थी संघातर्फे माजी विद्यार्थी,आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक तसेच शिक्षकेतर सहकाऱ्यांसाठी ‘क्रांतिज्योती विद्यालय’ या मराठी माध्यम चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला.हा कार्यक्रम सिंहगड रोडवरील ‘अभिरुची सिटी प्राईड’ येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

 

या विशेष शोचे आयोजन शशिकांत किवळे व प्रवीण पारगे यांनी केले. यावेळी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे,कलाकार अमेय वाघ, धनंजय देशपांडे यांच्यासह आजी-माजी शिक्षकवृंद उपस्थित होते.

 

चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक जाणिवेचा संदेश देत माजी विद्यार्थ्यांनी असा उपक्रम राबविल्याबद्दल हेमंत ढोमे व अमेय वाघ यांनी माजी विद्यार्थी संघाचे मनापासून आभार मानले.तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा विशेष शो आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

 

माजी शिक्षकांच्या वतीने माजी विद्यार्थी संघाचे सल्लागार सदस्य सेवानिवृत्त शिक्षक जाधव सर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. “शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं जपणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतात,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांनी हाऊसफुल्ल उपस्थिती लावत शालेय आठवणींना उजाळा दिला. “आमच्या जडणघडणीत महात्मा गांधी विद्यालय खानापूर येथील शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे,” असे संयोजक व माजी विद्यार्थी शशिकांत किवळे आणि प्रवीण पारगे यांनी सांगितले.

 

यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सुजाता वाघ व सारिका धावडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या ऋणातून प्रेरणा घेऊन असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक शशिकांत किवळे, प्रवीण पारगे यांच्यासह अमोल आबासाहेब जावळकर, नंदकुमार जावळकर, हेमंत पारगे, धनंजय सपकाळ, विष्णू जाधव, किरण माताळे, महेश तिपोळे, रुपाली किवळे, सुधाकर गायकवाड, गणेश मोकाशी, संभाजी जावळकर, मनिष जावळकर, अश्विनी चौधरी, अश्विनी नेमाने यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी शिक्षक शशिकांत जाधव,अंजली पायगुडे, रमेश कोकाटे, आनंद पिंगळे, बाळासाहेब रुपनवर, राजेंद्र हगवणे तसेच मुख्याध्यापक शिवराम साबळे, ज्योत्स्ना गुरव, डाॅ. कीर्ती जाधव, भिमराव आदलिंग, सुजाता भोसले, अपर्णा आढाव, नूतन ओतुरकर, मीरा कदम, मोकाशी मॅडम, ज्येष्ठ नाईक रमेश जावळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

दरम्यान, माजी विद्यार्थी संघातर्फे लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचे स्वागत करताना शशिकांत किवळे व माजी विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे खानापूरच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची सामाजिक बांधिलकी आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!