आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

ग्रामीण जनतेसाठी दिलासादायक उपक्रम : राजगड तालुक्यात 50% सवलतीत LED Smart TV व पिठाची गिरणीचे वाटप आमदार शंकरभाऊ मांडेकर व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष किरणभाऊ राऊत यांच्या पुढाकारातून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


राजगड (प्रतिनिधी महेश सणस)

राजगड तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि कौतुकास्पद असा सामाजिक उपक्रम आजपासून सुरू झाला आहे. आमदार श्री. शंकरभाऊ मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजगड तालुका अध्यक्ष श्री. किरणभाऊ राऊत यांच्या विशेष पुढाकारातून LED Smart TV तसेच टू-इन-वन पिठाची गिरणी 50% विशेष सवलतीत उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

हा उपक्रम 14 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती वापरातील उच्च दर्जाच्या वस्तू परवडणाऱ्या दरात मिळाव्यात, हा यामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

 

 

🔸 सवलतीत उपलब्ध असलेल्या वस्तूंची माहिती

 

वस्तू मूळ किंमत सवलत दर

 

32″ Smart LED TV ₹ 15,999 ₹ 7,999

40″ Smart LED TV (FHD) ₹ 24,000 ₹ 11,999

43″ Smart LED TV (Full HD) ₹ 29,000 ₹ 14,499

50″ Smart LED TV (4K) ₹ 46,000 ₹ 22,999

पिठाची गिरणी (टू-इन-वन) ₹ 18,700 ₹ 9,699

 

 

या दरांमुळे नागरिकांना दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू जवळपास अर्ध्या किंमतीत घेण्याची संधी मिळत असल्याने उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

 

 

🔸 वितरण ठिकाण:

 

राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, वेल्हे बु.

 

🔸 संपर्क क्रमांक:

 

📞 9021262116

📞 8806873714

📞 राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय : 7517025353

 

 

 

उपक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना विशेष लक्षवेधी होत्या. “ग्रामीण कुटुंबांसाठी अशा सवलतीच्या योजनांची नितांत गरज आहे. घरगुती सुविधा परवडणाऱ्या दरात मिळणं हा मोठा दिलासा आहे,” अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.

 

आमदार शंकरभाऊ मांडेकर आणि तालुका अध्यक्ष किरणभाऊ राऊत यांनी नागरिकांनी या योजनेचा लाभ लवकरात लवकर घ्यावा, असे आवाहन केले.

 


  • 👍
98
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!