आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राजगड तालुक्यात जनजागृती तसेच मतदान जनजागृती करण्यासाठी माननीय तहसीलदार निवास ढाणे साहेब यांच्या आदेशानुसार विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आंबवणे येथे स्वच्छता अभियानासह सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम BDO संजय ढमाळ साहेब, गटशिक्षणाधिकारी संग्राम पाटील तसेच नेताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय माऊली आप्पा तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तहसीलदार साहेबांच्या सूचनेनुसार शनिवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता आंबवणे ते करंजावणे अशी सायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये विद्यालयातील 15 मुली व 15 मुले अशा एकूण 30 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना सायकल स्पर्धेचे लोगो असलेले टी-शर्ट व टोपी देण्यात आले होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल गरड, विस्ताराधिकारी मुल्ला सर, केशव पवार सर, केंद्रप्रमुख बाळासाहेब शेख, तसेच विद्यालयातील शिक्षक श्रीमती साळुंखे मॅडम, श्री बोंद्रे सर, सोनकांबळे सर, पापळ सर, भोरडे सर, पवार मॅडम, वाल्हेकर सर, गायकवाड सर उपस्थित होते.
तसेच शिक्षकेतर कर्मचारी घोरे सुभाष, दामगुडे नितीन, कारळे गणेश यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडली.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा व लेझीमच्या गजरात रॅलीचे जल्लोषात स्वागत केले. आंबवणे प्राथमिक शाळा तसेच करंजावणे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनीही या रॅलीचे उत्साहात आणि उस्फूर्तपणे स्वागत करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासोबतच स्वच्छता व मतदान जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याचे दिसून आले.







