आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

कुसगावात कौटुंबिक वादातून पत्नीवर पतीची मारहाण; गुन्हा दाखल


भोर : तालुक्यातील कुसगाव येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारास कुसगाव येथील राहत्या घरासमोर ही घटना घडली. फिर्यादी सौ. चैताली विशाल अडुळकर (वय 33) या पतीसोबत दुचाकीवरून घरी येत असताना त्यांचे पती विशाल अडुळकर हे मद्यधुंद अवस्थेत असल्याने वाहन नीट चालवत नसल्याबाबत त्यांना त्यांनी जाब विचारला.

 

यावरून दोघांमध्ये वाद झाला. घरी आल्यानंतरही वाद वाढत गेला. यावेळी आरोपी पतीने पत्नीला शिवीगाळ करत रागाच्या भरात पाठीमागून डोक्यावर लोखंडी वस्तूने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच हातानेही मारहाण करून धमकावल्याचे सांगण्यात आले आहे.

 

या घटनेनंतर पीडित महिलेने राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोफौ बर्काले करीत असून पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.


  • 👍
100
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!