आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

किकवीत अवैध दारू विक्रीवर कारवाई; केंजळचा इसम ताब्यात


भोर : तालुक्यातील किकवी येथे अवैधरीत्या देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर राजगड पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11.50 वाजण्याच्या सुमारास किकवी (ता. भोर) गावच्या हद्दीत पुणे–सातारा सर्व्हिस रोडलगत कोहिनूर बारच्या बाजूच्या मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. गस्ती दरम्यान पोलिसांना एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळला.

 

त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे देशी दारूच्या ‘टॅंगो पंच’ या कंपनीच्या 180 मिली क्षमतेच्या 11 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या मालाची एकूण किंमत अंदाजे 880 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित इसम हा हा माल बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवत असल्याचे निष्पन्न झाले.

 

या प्रकरणी यशवंत मछिंद्र भालघरे (वय 32, रा. केंजळ ता. भोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मदने करीत असून पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.

 

दरम्यान, शिंदेवाडी ते सारोळ्या या हायवे पट्ट्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. हायवे लगतच्या मोकळ्या जागा, सर्व्हिस रोड आणि दुर्गम भागांमध्ये अशा प्रकारचे धंदे सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून सातत्याने कारवाई करावी व या अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!