खानापूर: येथील आपलं घर संस्थाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांची व्याख्यानमाला उत्साहात पार पडली.
व्याख्यानमालेचे उद्घाटन आपलं घर संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्याख्याते डॉ. सुलभा विधाते, संदीप वाटवे, संजय पिंगळे, अजय आगावणे यांच्यासह माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अमोल जावळकर, सदस्य आर. जी. यादव आणि मुख्याध्यापक शिवराम साबळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना परीक्षेचे मानसशास्त्र समजावून देत प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. विजय नवले यांनी अभ्यासाचे नियोजन, तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे तंत्र तसेच गुणवत्तावाढीसाठी आवश्यक सवयी याबाबत सखोल उद्बोधन केले. व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनात उल्हे क्लासेसचे संचालक मा. मनोज उल्हे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ही व्याख्यानमाला मुख्याध्यापक शिवराम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या सर्व विषय शिक्षकांनी आयोजित केली. समन्वयक म्हणून भगवान मदने यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक शिवराम साबळे यांनी केले.
या व्याख्यानमालेला दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ अध्यापिका नूतन ओतुरकर, मीरा कदम आणि रमेश कोळी यांचीही उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या परीक्षा तयारीसाठी उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाबद्दल पालक व शिक्षकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.










