आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

दिवाळी चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा युवासेनेकडून सत्कार लव्ही (खुर्द) जिल्हा परिषद शाळेत उत्साहाचे वातावरण


 

विंझर वार्ताहर – दि.१४ : समीर कांबळे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लव्ही (खुर्द) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना युवासेनेतर्फे पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. युवासेना उपाध्यक्ष मंगेश भैय्या रेणुसे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

कार्यक्रमात उपस्थित युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देत त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

 

विजेत्या विद्यार्थ्यांची नावे –

 

प्रथम : समर्थ बापू कडू

 

द्वितीय : स्वरा अशोक खेडकर

 

तृतीय : ज्ञानेश्वरी विठ्ठल कडू

 

चतुर्थ : स्वरा सतीश रसाळ

 

पाचवा : ईश्वरी विठ्ठल कडू

 

 

कार्यक्रमाला युवासेना तालुका अध्यक्ष योगेश (दादा) लिम्हण, निलेश चोरघे, ओमकार कदम, तेजस दामगुडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

 

पारितोषिक वितरणानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मुख्याध्यापक खेडकर सर आणि रासकर मॅडम यांनी मंगेश रेणुसे यांचे विशेष आभार मानले. शाळेसाठी आवश्यक असलेल्या काही सुविधांची मागणीही यावेळी करण्यात आली.

 

यावेळी बोलताना मंगेश रेणुसे म्हणाले, “शाळेसाठी कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही. विद्यार्थ्यांनी गावाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.” तर युवासेना तालुका अध्यक्ष योगेश दादा लिम्हण यांनीही शाळेसाठी नेहमीच मदतीला तत्पर राहण्याचे आश्वासन दिले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या सणात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेला हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!