आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

एशियन कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘जागतिक एड्स दिन’ उत्साहात; विद्यार्थ्यांकडून प्रभावी जनजागृती रॅली 


 

राजगड वार्ताहर : समीर कांबळे

 

​ए.ए.ई.आर.चे एशियन कॉलेज ऑफ फार्मसी, धायरी, पुणे येथे गुरुवार, दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी ‘जागतिक एड्स दिन’ विविध जनजागृती आणि शैक्षणिक उपक्रमांसह अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाने या कार्यक्रमातून सामाजिक आरोग्य आणि जागरूकता क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

 

​संस्थेच्या दूरदृष्टीच्या अध्यक्षा डॉ. अनिता साप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. आनंद साप्ते आणि सचिव श्री. अनिल साप्ते यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य व प्रोत्साहन दिले.

 

​शैक्षणिक आणि कृती कार्यक्रम:

 

कार्यक्रमाचे प्रभावी मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. पी. जे. देसाई यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर एड्स दिनाचे महत्त्व विशद केले. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना HIV/AIDS प्रतिबंधाचे अचूक मार्ग, संसर्ग होण्याचे शास्त्रीय मार्ग, उपलब्ध अद्ययावत उपचार पद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

​यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामाजिक संदेश देणाऱ्या विविध कृतींमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. यात ‘जागरूकता रॅली’, ‘घोषवाक्य उपक्रम’, आणि ‘पथनाट्य’ योग्य आणि शास्त्रीय माहिती पोहोचवून समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, तसेच गैरसमज आणि कलंक निर्मूलन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

 

​ए.ए.ई.आर.चे एशियन कॉलेज ऑफ फार्मसीने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या जनहिताच्या या यशस्वी उपक्रमाचे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.


  • 👍

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ

error: Content is protected !!