आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर-पुणे मार्गावर भोलावडेजवळ जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया, शहराचा पुरवठा विस्कळीत


 भोर प्रतिनिधी: तबरेज खान

 

भोर–पुणे मार्गावरील भोलावडे गावाजवळ होत असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान निष्काळजीपणा. रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या JCB खोदकामावेळी भोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी तुटली. अचानक फुटलेल्या या पाईपमुळे काही मिनिटांतच लाखो लिटर पाणी रस्त्यावर ओसंडून वाहू लागले.

 

घटनास्थळी अक्षरशः पाणीच पाणी दिसत होते. मोठ्या प्रमाणावर वाहून गेलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. आसपासच्या भागात पाण्याचा अपव्यय झाल्याने नागरिकांतही नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.

 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे. संबंधित यंत्रणांनी योग्य काळजी न घेता खोदकाम सुरू केल्याने महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीचे मोठे नुकसान झाले.

 

मुख्य जलवाहिनी फुटल्याने भोर शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, पुढील काही तास पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे. अचानक बंद झालेल्या पुरवठ्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

 

या घटनेमुळे लाखो लिटर पाणी विनाकारण वाहून गेल्याने पाणीटंचाईची समस्या तीव्र असलेल्या परिसरात मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कामांदरम्यान दक्षता घेण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


  • 👍
102
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!