आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोंगवली–कामथडी गटातून महेश टापरे यांची उमेदवारी जाहीर करण्याची जनतेची मागणी तीव्र १५ वर्षांच्या सामाजिक व राजकीय कार्यातून विश्वासार्ह नेतृत्व म्हणून महेश टापरे यांची ओळख


 

भोर तालुक्यातील भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटातून येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. महेश निवृत्ती टापरे यांचे नाव सर्वसामान्य जनतेतून, कार्यकर्त्यांतून तसेच विविध सामाजिक घटकांतून मोठ्या विश्वासाने पुढे येताना दिसत आहे. गेल्या १५ ते १६ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले महेश टापरे हे आज पूर्व भागातील एक विश्वासार्ह, संघर्षशील आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत.

टापरे हे मूळचे टापरेवाडी (ता. भोर, जि. पुणे) येथील रहिवासी असून त्यांचा जन्म २१ एप्रिल १९८८ रोजी झाला आहे. त्यांनी डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (हार्डवेअर व नेटवर्किंग) चे शिक्षण घेतले असून सध्या ते शेती व्यवसाय करत आहेत. समाजकार्य व राजकारण ही त्यांची विशेष आवड असून त्याच भावनेतून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे.

महेश टापरे हे शिवतेज कला, क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष असून या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. मोफत आरोग्य शिबिरे, डोळे तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, महिलांसाठी देवदर्शन व सामाजिक कार्यक्रम, शिवजयंती महोत्सव, सप्ताह आयोजन, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा उपक्रमांमुळे टापरे यांचे कार्य गावागावात पोहोचले आहे.

सामाजिक बांधिलकी जोपासताना त्यांनी अनेक गरजू रुग्णांना रुग्णालयातील उपचार व बिलांबाबत मदत केली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करून त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. त्यामुळे ‘काम करणारा नेता’ अशी त्यांची प्रतिमा जनतेच्या मनात ठामपणे निर्माण झाली आहे.

राजकीय क्षेत्रातही महेश टापरे यांनी केवळ पदासाठी नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. मा. संग्रामादादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवत यशस्वी आंदोलने केली आहेत. भोर तालुक्यातील वीज पुरवठ्याच्या समस्यांवर, पुणे–बेंगलोर महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांवर, एस.टी. महामंडळाच्या भोंगळ कारभारावर, भोर–वीर रस्त्यावरील खड्ड्यांवर, खेड–शिवापूर टोलनाक्यावर स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासावर, तालुक्यातील पाणी प्रश्नावर तसेच महागाईविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलने केली.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट, कबड्डी आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. बक्षिसे, सन्मान व मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेक तरुणांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.

आज भोंगवली–कामथडी गटातील सर्वसामान्य जनता, युवक, महिला, शेतकरी व विविध समाजघटकांतून एकच सूर उमटताना दिसत आहे की, महेश टापरे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी द्यावी. “शिव–शाहू–फुले–आंबेडकर विचारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते, सर्व जलसमुदाय व सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व” अशी त्यांची ओळख असून, त्यांच्यावर जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.

भोर तालुक्याच्या पूर्व भागातील विकासासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी आणि जिल्हा परिषदेमध्ये जनतेचा आवाज बुलंदपणे मांडण्यासाठी महेश टापरे हे सक्षम व योग्य उमेदवार असल्याची भावना आता सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यामुळे पक्षाने वेळ न दवडता त्यांची उमेदवारी जाहीर करावी व जनतेच्या अपेक्षांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!