आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

इंडियन आर्मी टेक्निकल मध्ये कामथडीचा जवान – विवेक इंगुळकर यांचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी


प्रतिनिधी : विलास धोंगडे नसरापूर

भोर तालुका – पुणे जिल्ह्यातील कामथडी गावातील विवेक शिवाजी इंगुळकर या तरुणाने इंडियन आर्मी टेक्निकल विभागात मिळवलेली निवड ही केवळ वैयक्तिक कामगिरी नसून, एका संपूर्ण कुटुंबाची, शिक्षकांची आणि गुरुंच्या मार्गदर्शनाची फलश्रुती आहे. केवळ २० वर्षांच्या वयात फौजी होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा विवेक आज अनेक ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

शिक्षणातील सातत्य आणि जिद्दीचा पाया

विवेकने १० वी शिक्षण शिवभूमी विद्यालय, खेड शिवापूर येथे ७७% गुणांसह पूर्ण केले. त्याच शाळेत २६ जानेवारीला परेड आणि भाषणामुळे त्याच्या मनात देशसेवेची ठिणगी अधिक प्रज्वलित झाली. शिक्षकांनी दिलेल्या संधींमुळे, ‘लीडर’ बनण्याच्या अनुभवामुळे फौजी जीवनाबद्दलची आकर्षण व आदर अधिक दृढ झाला.

१२ वी शिक्षणासाठी त्याने शिवाजी विद्यालय, नसरापूरची वाट धरली आणि ६३% गुण मिळवत पुढे डिफेन्सच्या तयारीसाठी आपला मार्ग ठरवला. दोन्ही शाळांतील शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन, मूल्यांची शिकवण आणि प्रेरणा यांचा त्याला मोठा आधार मिळाला.

कमांडो करिअर अकॅडमीचे मार्गदर्शन – यशाचा खरा पाया

बारावी नंतर विवेकने धनकवडी येथील कमांडो करिअर अकॅडमी पुणे जॉईन केली. सुरुवातीच्या दिवसांत त्याची शारीरिक तयारी अनेक अडचणींचा सामना करत होती. १६०० मीटर धावायला तो तीन फेऱ्यांनंतर थांबायचा. पहिल्या डेमोचा टाइम ७:३० मिनिटांचा होता.

पण अकॅडमीचे संस्थापक मयूर गायकवाड सर यांनी घेतलेली मेहनत, योग्य प्रशिक्षण पद्धती, कठोर परंतु आपुलकीचे मार्गदर्शन आणि ध्येय निश्चित करून केलेली तयारी — यामुळे विवेक दिवसेंदिवस सक्षम, मजबूत आणि आत्मविश्वासू बनत गेला.

सैनिक बनण्याच्या या प्रवासात मयूर सरांचा सिंहाचा वाटा असल्याचे विवेक स्वतः सांगतो. ते केवळ प्रशिक्षक नव्हते, तर मोठ्या भावाप्रमाणे आधार देणारे मार्गदर्शक होते.

कुटुंबाची निस्सीम साथ — विशेषतः बहिणीची

विवेकच्या यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबाचे प्रेम आणि गावकऱ्यांचा विश्वास तर होता,च पण त्याची बहीण शिवानी इंगुळकर हिची भूमिका अतिशय महत्वाची होती. तिने कधीच काही कमी पडू दिले नाही, प्रत्येक टप्प्यावर त्याला मोटिवेट केले, प्रोत्साहन दिले आणि संकटांमध्ये बळ दिले.

विवेक सांगतो, “आईसारखी बहिण आणि मोठ्या भावासारखे गुरु लाभले म्हणूनच आज मी फौजी झालो.”

गावाचा अभिमान – कामथडीचा जवान तयार

विवेक इंगुळकरचे इंडियन आर्मी टेक्निकल मध्ये सिलेक्शन झाल्याची बातमी गावात पोहोचताच सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

गावकऱ्यांना आपल्या मुलाने मिळवलेल्या या यशाचा अभिमान असून, अनेक तरुणांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

त्याच्या मनोगतात उमटलेला भावपूर्ण संदेश

देशसेवा ही त्याची केवळ करिअरची निवड नाही, तर बालपणापासून मनाशी धरलेले स्वप्न आहे. शाळेपासून ते अकॅडमीपर्यंत मिळालेले मार्गदर्शन, कुटुंबाचे आधारस्तंभ, गुरुंचे मोलाचे योगदान आणि स्वतःची चिकाटी यामुळे तो आज भारतीय सेनेत दाखल होत आहे.

भविष्यात देशाची सेवा करताना स्वतःला सिद्ध करण्याची उर्मी त्याच्या प्रत्येक शब्दातून जाणवते.

कामथडीचा हा तरुण सैनिक उद्या देशाच्या सीमांवर उभा राहून राष्ट्ररक्षणाची जबाबदारी पार पाडणार आहे, हीच त्याची खरी ओळख आणि सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!