आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

नीरा भीमा कारखान्याकडून दुसऱ्या पंधरवड्याचे ऊस बिल रु. ३१०१ प्रमाणे बँकेत जमा – सौ. भाग्यश्री पाटील


इंदापूर : प्रतिनिधी सागर जगदाळे भिगवन 

 

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालू सन २०२५–२६ च्या ऊस गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाचा दि. १६ ते ३० नोव्हेंबर या दुसऱ्या पंधरवड्याचा पहिला हप्ता विना कपात प्रती टन रु. ३१०१ या दराने सोमवारी (दि. १५) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

 

नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) चे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी उच्चांकी प्रती टन रु. ३१०१ इतका ऊस दर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापूर्वी दि. १ ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्याचा ऊस बिलही याच दराने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता दुसऱ्या पंधरवड्याची रक्कमही वेळेत जमा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे.

चालू ऊस गळीत हंगामात ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्या दिशेने कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सौ. भाग्यश्री पाटील यांनी सांगितले. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम अत्यंत उत्कृष्ट कार्यक्षमतेने सुरू असून प्रतिदिन सुमारे ५७०० ते ६००० मे. टन ऊस गाळपाची क्षमता साध्य केली जात आहे. मंगळवारअखेर कारखान्याने एकूण २ लाख ६४ हजार ७८२ मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे.

 

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी तसेच हितचिंतक यांचे सौ. भाग्यश्री पाटील यांनी अभिनंदन केले. त्या पुढे म्हणाल्या की, कारखान्याकडून शेतकऱ्यांचा सर्व ऊस गाळप केला जाणार असून गाळपाअभावी एकही टिपरू ऊस शिल्लक राहणार नाही. ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.

 

शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी घाई करू नये. शेतकी विभागामार्फत शिस्तबद्ध ऊस तोडणी कार्यक्रम राबविण्यात येत असून, चांगल्या प्रतीच्या ऊसाचा पुरवठा कारखान्यास केल्यास आगामी काळात अधिकचा ऊस दर देणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ऊस लागवडीचे क्षेत्र वाढवून उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अॅड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे तसेच कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ आदी उपस्थित होते.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!