आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत भीषण अपघात; शिक्षकाचा मृत्यू


प्रतिनिधी सागर जगदाळे भिगवन 

भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत मौजे शेटफळगडे चौकात आज (12 डिसेंबर 2025) दुपारी साधारण 1.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र श्रीहरी भोसले (वय 55, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) हे आपल्या टीव्हीएस वीगो स्कूटीवरून (क्रमांक MH 12 KS 0797) जात असताना समोरून आलेल्या आयशर टेम्पोने (क्रमांक MH 11 AL 6672) दिलेल्या जोरदार धडकेत ते गंभीर जखमी झाले. टेम्पो चालकाची ओळख युवराज संतोष नेवसे (रा. कोळकी, फलटण) अशी झाली आहे.

 

धडक इतकी भीषण होती की महेंद्र भोसले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर भिगवण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

 

या दुर्घटनेमुळे भिगवण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!