आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी – माजी आमदार संग्राम थोपटे


भोर : प्रतिनिधी : तबरेज खान

भोर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भोर येथील कार्यालयात पार पडल्या.

उद्यापासून नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, त्याआधीच भाजपने आपली रणनीती वेगाने आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे मुख्य निवडणूक प्रभारी राजेंद्र शिळीमकर, सहप्रभारी गिरीष जगताप आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी या मुलाखती घेतल्या.

या वेळी “या निवडणुकीत भोर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा नक्की फडकणार”, असा विश्वास संग्राम थोपटे तसेच दोन्ही निवडणूक प्रभार्‍यांनी व्यक्त केला. भोर नगरपालिकेत भाजप विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अशी मुख्य लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, काल अजित पवार यांनी भोरमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले की, “भोर मतदारसंघातील भोर, राजगड आणि मुळशी या तीनही पंचायत समित्या, जिल्हा परिषद आणि नगरपालिका राष्ट्रवादी विचारांनी आणायच्या आहेत.” हे विधान करत त्यांनी संग्राम थोपटे यांना अप्रत्यक्षरीत्या आव्हान दिलं होतं.

त्यावर प्रत्युत्तर देताना संग्राम थोपटे म्हणाले,

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलद निर्णय घेत आहेत, त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास भाजपवर अधिक वाढला आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे जो दिलेलं वचन पाळतो आणि लोकांच्या हिताची कामं करतो. कोण काय आव्हान देतं यापेक्षा, येणाऱ्या निवडणुकीत भोर, राजगड आणि मुळशी या तीनही तालुक्यांमधील पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा नक्की फडकेल.”

भोर तालुक्यातील राजकीय समीकरणांना आता वेग आला असून, दोन्ही पक्षांच्या तयारीमुळे या निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!