वेल्हे प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
प्रहार अपंग क्रांती संघटना, राजगड तालुक्याच्या वतीने वेल्हे गावामध्ये जागतिक दिव्यांग दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यांना अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना केल्या.दिव्यांग बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणींची माहिती घेण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि सर्व लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले.
योजनेच्या लाभासाठी प्रशासनाला सूचना देण्यात
आल्या याप्रसंगी कार्यक्रमास तहसीलदार निवास ढाणे साहेब, पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी चौधरी मॅडम, समाज कल्याण विभागाचे झगडे साहेब, ग्रामीण रुग्णालयाचे शिवाजी सर, पुरवठा विभागाचे आगलावे साहेब, देशमुख साहेब आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
संघटनेच्या प्रयत्नांचे कौतुक
प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष नामदेव वालगुडे आणि गजानन आप्पा कोकाटे, कल्पनाताई देवगिरीकर व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे अत्यंत चांगले आणि प्रभावी नियोजन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लाभार्थ्यांना महत्त्वाच्या योजनांची माहिती मिळाली.
यावेळी मा जि परिषद सदस्य आनंद (आण्णा) देशमाने , व्हाईस चेअरमन संतोष बापु मोरे, युवा नेते गणेशराव उफाळे, राहुल रणखांबे तसेच लोकार्पण अकॅडमीचे विद्यार्थी तसेच भोर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष बापूराव कुडले, संपर्कप्रमुख भानुदास दुधाने, उपाध्यक्ष सोनवणे, किरण रांजणे, सहसचिव संपत जागडे, श्रीपती कोडीतकर, युवराज चोरगे, राजू झगडे, सतीश दसवडकर, शिवाजी कडू व प्रहार संघटनेचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या चार वर्षांपासून कार्यक्रमासाठी जेवण व्यवस्था करणाऱ्या सौ. मीनाताई अनिल भुरुक यांचा संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांचे हे निःस्वार्थ सेवाकार्य प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
हा कार्यक्रम दिव्यांग बांधवांना आत्मविश्वास देणारा आणि त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणारा एक सकारात्मक उपक्रम ठरला.










