विंझर वार्ताहर समीर कांबळे
राजगड (वेल्हे) तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग धरला असून, पानशेत खोऱ्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आमदार संग्रामदादा थोपटे आणि नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांच्या झंझावाती उपस्थितीत झालेल्या भव्य सभेत, पानशेत परिसरातील तब्बल सहा गावांमधील दिग्गज सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे ‘कमळ’ हाती घेतले. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे पानशेत पट्ट्यात भाजपची ताकद प्रचंड वाढली असून विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
*जनतेचा अथांग महासागर; विजयाचा महासंकल्प*
विंझर-पानशेत जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. शिवराज (बापू) शेंडकर तसेच पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सीमाताई नानासाहेब राऊत व श्री. गणेश जागडे यांच्या प्रचारार्थ या विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला झालेली जनसागराची गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, यंदा या गटात परिवर्तनाची लाट असून भाजपचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे
.
*दिग्गजांची ‘एन्ट्री’; विरोधकांना धोक्याची घंटा*
या सभेत अनेक मातब्बर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपाचे हात बळकट केले. यामध्ये प्रामुख्याने:
श्री. जयवंत निवृगुणे (माजी सरपंच, कशेडी)
श्री. विकास मोरे (माजी उपसरपंच, टेकपोळे)
श्री. आकाश कडू (उपसरपंच, गोंडेखल)
यांच्यासह श्री. गोविंद कडू, श्री. नवनाथ ठाकर, श्री. शिवाजी कडू, श्री. हनुमंत कडू, श्री. पांडुरंग कडू, श्री. धनाजी कडू, श्री. राम कडू, श्री. नंदू बामगुडे, श्री. संदीप कडू, श्री. विशाल दोनहे, श्री. कुणाल बामगुडे, श्री. मंगेष बामगुडे यांसारख्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.
””हा केवळ जनसमुदाय नसून जनतेने विकासावर दाखवलेला अभेद्य विश्वास आहे. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आणि रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनता या निवडणुकीत परिवर्तनाची नवी गाथा लिहिणार, हे आजच्या उत्साहावरून सिद्ध झाले आहे.”
— शिवराज (बापू) शेंडकर” (उमेदवार, जिल्हा परिषद)
*विकासाच्या मुद्द्यावर रणशिंग*!
यावेळी बोलताना नेत्यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात झालेल्या कामांचा पाढा वाचला. पानशेत खोऱ्यातील दुर्गम भागाचा विकास, रस्ते आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. या सभेमुळे राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, भाजपच्या उमेदवारांचे पारडे सध्या जड दिसत आहे.







