भोर तालुक्यात आज मोठा राजनीतिक भूचाल होत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ला जोरदार धक्का बसला आहे. भोर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व माजी कार्यक्षम सरपंच सौ. विद्याताई यादव यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये भव्य प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भोरचे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडत आहे. विद्याताई यादव यांच्या प्रवेशामुळे कामथडी–भोगवली गट आणि वेळू–नसरापूर गटामध्ये भाजपची पकड प्रचंड बळकट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन अँड. संभाजीबापू यादव (सरपंच देगाव), श्री विठ्ठलदादा खाटपे, श्री गणेशआबा यादव, श्री चंद्रशेखर भाऊ यादव प्रतीक यादव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अधिक प्रभावी झाले असून अशोक आबा शेलार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला मोठा उठाव देत आहे.
स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची विशेष उपस्थिती आणि युवा कार्यकर्त्यांचा जोश यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

विद्याताई यादव म्हणाल्या,
“भोर तालुक्याच्या विकासासाठी आणि महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही कमळाची वाट निवडली असून जनता-विकास हाच आमचा मुख्य अजेंडा आहे.”
या प्रवेशामुळे भोर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे बदल होणार असून भाजपची ताकद आगामी काळात आणखी दृढ होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.










