आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

खानापूर : गरजू व हुशार विद्यार्थ्यांसाठी संजय पासलकर यांचे आर्थिक सहाय्य कै. बाबुरावजी पासलकर प्रतिष्ठानचा उपक्रम; २० हजारांचे शैक्षणिक शुल्क वाटप


खानापूर : प्रतिनिधी शंकर ढेबे

 

खानापूर (ता. भोर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयातील गरजवंत आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण अशी मदत मिळाली आहे. ‘कै. बाबुरावजी पासलकर प्रतिष्ठान, पुणे’ चे सचिव संजयजी पासलकर यांनी ‘जागर सावित्रीचा’ कार्यक्रमांतर्गत आप्तस्वकीय व कै. विनायक शंकर तांदळे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना सुमारे २० हजार रुपयांचे शैक्षणिक शुल्क तसेच साहित्याचे वाटप केले.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी मिळावी यासाठी हे योगदान दिल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पासलकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेत आपल्या आई-वडिलांचा आणि शाळेचा अभिमान वाढवावा.” तसेच त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतही मुलांना मार्गदर्शन केले.

 

या उपक्रमासाठी माजी शिक्षक शशिकांत जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. “संजयजी पासलकर हे शाळेच्या प्रगतीत सतत मोलाचे योगदान देत असतात,” असे गौरवोद्गार मुख्याध्यापक शिवराम साबळे यांनी काढले.

 

विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे वाटप संजयजी पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक व कवी रमेश तांबे, अशोक पासलकर, रघुनाथ यादव, प्राचार्य शिवराम साबळे, वृत्तपत्र लेखक व माजी शिक्षक शशिकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कवी रमेश तांबे यांनी बालकवितांच्या माध्यमातून मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

 

पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षिका ज्योत्स्ना गुरव यांनी करून दिला.

सूत्रसंचालन भगवान मदने यांनी तर आभार नूतन ओतुरकर यांनी मानले.

 

प्रशासकीय सहकार्यात रायबा कुंभार, अशोक जावळकर, रमेश जावळकर, प्रकाश रोकडे, संतोष पंडीत, रुपाली जावळकर यांनी योगदान दिले.

 

यावेळी ज्येष्ठ शिक्षिका ज्योत्स्ना गुरव, भीमराव आदलिंग, भगवान मदने,नूतन ओतुरकर, मीरा कदम, अपर्णा आढाव, शीतल वरपे, मोरे, मोकाशी, लोणकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलकलेखन अपर्णा आढाव यांनी केले.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!