आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

श्रीमती शशिकला निवृत्ती (बाप्पू) गोरड पंचायत समिती, कामथडी गणातून इच्छुक उमेदवार


भोर : समाजकार्य, विकासाची जिद्द आणि जनतेतील नातं या त्रिसूत्रीवर काम करत, गेली ५५ वर्षे सतत लोकसेवेची अखंड परंपरा जपणाऱ्या श्रीमती शशिकला निवृत्ती (बाप्पू) गोरड या यंदा पंचायत समिती, भोर-कामथडी गणातून उमेदवारी दाखल करण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्यांच्या इच्छुक उमेदवारीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

श्रीमती गोरड या मा. चेअरमन, संगमनेर विकास सेवा सहकारी संस्था मर्या., तसेच मा. सदस्या ग्रामपंचायत संगमनेर म्हणून कार्यरत राहिल्या असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

थोपटे कुटुंबियांच्या विकास कार्यातील विश्वासू सहकारी

मा. अनंतरावजी थोपटे साहेब यांच्या कार्यकाळात त्यांनी खंबीरपणे पाठीशी राहून विकास कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २००९ पासून मा. संग्रामदादा थोपटे साहेब यांच्या प्रत्येक निर्णयात त्या तितक्याच जिद्दीने व जबाबदारीने मार्गदर्शन करत आल्या आहेत.

पंचक्रोशीत प्रभावी समाजकार्य

संगमनेर, आळंदे, भैरवनाथनगर, माळवाडी, नर्हे, ब्राह्मणघर, हरणस, लव्हेरी, माझगाव, जोगवडी, गोरड म्हसवली, आसकवडी, वाकांबे आदी गावांतील लोकांशी त्यांचा घनिष्ठ संपर्क आहे. प्रत्येक गावातील सुखदुःखात त्या स्वतःहून सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांना “गोरड काकी” या नावाने सर्वजण स्नेहाने ओळखतात.

दिवंगत बाप्पू गोरड यांचे कार्य आजही लोकांच्या मनात

त्यांचे पती दिवंगत नेते कै. निवृत्ती (बाप्पू) बाळासाहेब गोरड यांच्या कार्याने आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या पश्चात २६ वर्षे उलटली तरी लोक त्यांचे कार्य विसरू शकलेले नाहीत. गोरड दाम्पत्याने संगमनेर, माळवाडी, तसेच आसपासच्या गावांमध्ये पाण्याच्या नळजोड योजनांद्वारे स्त्रियांच्या डोक्यावरील हांडे उतरवण्याचे ऐतिहासिक कार्य केले. ही कामे आजही पंचक्रोशीत लोकांच्या स्मरणात आहेत.

पारदर्शकता व प्रामाणिकतेचा आदर्श

गेल्या ५५ वर्षांत विविध पदांवर काम करताना त्यांनी भ्रष्टाचाराचा किंचितही डाग न लागता समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. लोकांच्या प्रत्येक समस्येकडे त्यांनी आपले कर्तव्य म्हणून पाहिले आणि त्या समस्येवर मार्ग काढला.

उमेदवारीची चर्चा तेजीत

अशा समृद्ध समाजसेवक व सर्वांना जवळ घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे पंचायत समिती भोर-कामथडी गणातून त्यांच्या उमेदवारीची दावेदारी पुढे येताच, इतर दावेदार मागे पडल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. जनतेचा विश्वास, थोपटे कुटुंबियांचे मार्गदर्शन आणि स्वतःचा जनसंपर्क या तिन्ही बळावर त्या आगामी निवडणुकीत एक मजबूत उमेदवार म्हणून उदयास येत आहेत.


  • 👍
98
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!