आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भिगवणमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धा, सेवा व सामाजिक जाणिवेचा जागर


भिगवण (प्रतिनिधी): सागर जगदाळे 

स्वच्छता, श्रम, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिगवण नगरीत श्रद्धा, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. परीट समाज संघटना व भिगवण ग्रामपंचायतीच्या संयुक्त पुढाकारातून हा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

 

भिगवण येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारक येथे त्यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या मनात गाडगेबाबांच्या विचारांची ज्योत पुन्हा एकदा प्रज्वलित झाली. ग्रामपंचायत कार्यालयातही त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाजसुधारणेच्या कार्यास भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

 

या कार्यक्रमास भिगवण ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गुराप्पा पवार, इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य संजय देहाडे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य तुषार क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य सचिन बोगावत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अजिंक्य माडगे यांच्यासह दत्तात्रय पाचांगणे, प्रदीप वाकसे तसेच खानावटे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तसेच इंदापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बबन धायतोंडे, पत्रकार संजय शिंदे, दत्तात्रय आहेर, शेलार यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

परीट समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक व महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाचे पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष नवनाथ कदम, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष निलेश गायकवाड, इंदापूर तालुका अध्यक्ष गणेश राक्षे यांच्यासह भरत कदम, अरुण नवले, सुदाम गायकवाड, प्रशांत शिंदे, योगेश गायकवाड, अभि शिंदे, आबा थोरात आदी मान्यवरांनीही उपस्थिती लावली.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना गाडगेबाबांचे स्वच्छतेतून समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता आणि सेवाभावाचे कार्य आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ असल्याचे सांगितले. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि तो कृतीतून पुढे नेण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!