नसरापूर (प्रतिनिधी विलास धोंगडे)
शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळामार्फत आयोजित हडपसर गटपातळी कुस्ती स्पर्धा मंगळवार दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. तरुण खेळाडूंच्या दमदार खेळीने मैदान दणाणून गेले.
या स्पर्धेत वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पहिले क्रमांक पटकावले.
६१ किलो वजनी गट: वेदांत देशमुख – एस.जी.आर.एस. कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड
६५ किलो वजनी गट: समर्थ शेडगे – अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर
९७ किलो वजनी गट: अभय जायगुडे – शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर
१२५ किलो वजनी गट: गौरव मराठे – शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर
तसेच साहिल मोहोळ यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्तम खेळ spirit दाखवला. विजेत्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून, या पुढील सामने बालेवाडी येथे होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार एन.एस., तसेच राष्ट्रीय कुस्ती पंच तुषार गोळे उपस्थित होते.
या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. पौर्णिमा कारळे, प्रा. भगवान गावित, प्रा. संदीप लांडगे, प्रा. जीवन गायकवाड, प्रा. वैष्णवी कोंडे, विकास ताकवले, शिवाजी सोनवणे, महेश दळवी, धनाजी माने, अभिषेक मोरे, सुमित कांबळे, सीमा देशमुख व मनीषा मोहिते यांच्या टीमने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप लांडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पौर्णिमा कारळे यांनी मानले.










