राजगड | प्रतिनिधी
राजेंद्र रणखांबे
राजगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगात सुरू असून जिल्हा परिषदेसाठी एकूण ९ आणि पंचायत समितीसाठी एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमिता तळेकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध गट-गणांमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्याने तालुक्यात निवडणूक रंगत वाढली आहे.
जिल्हा परिषद गट – उमेदवारी अर्जांची स्थिती
वेल्हे-वांगणी जिल्हा परिषद गट
या गटासाठी विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
भारतीय जनता पार्टी :
शिवाजी बाबासो चोरघे
तानाजी दगडू मांगडे
सागर तानाजी मांगडे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) :
गोरक्षनाथ शंकर भुरुक
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) :
(अर्ज दाखल – उमेदवाराची नोंद)
अपक्ष :
शंकर कृष्णा रेणुसे
विंझर-पानशेत जिल्हा परिषद गट
या गटातही प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार उतरल्याचे चित्र आहे.
भारतीय जनता पार्टी :
शिवराज चंद्रकांत शेंडकर
भगवान ज्ञानोबा पासलकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) :
१ उमेदवाराचा अर्ज दाखल
अपक्ष :
१ उमेदवाराचा अर्ज दाखल
अनंता रेवणनाथ दारवटकर
—
पंचायत समिती गण – उमेदवारी अर्जांची स्थिती
वांगणी गण
भारतीय जनता पार्टी :
विशाल मारुती वालगुडे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) :
हनुमंत राजाराम कार्ले
विजय बाबासाहेब चोरघे
इतर :
१ फॉर्म शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून
१ फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून
विंझर गण
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) :
अभिषेक शिवाजी शेंडकर
भारतीय जनता पार्टी :
गणेश नामदेवराव जागडे
(१ उमेदवाराचा अर्ज)
अपक्ष :
राजू प्रभाकर रेणुसे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) :
दिलीप महादेव रेणुसे
तुषार ज्ञानोबा जावळकर
पानशेत गण
भारतीय जनता पार्टी :
सीमा विष्णू राऊत
भाग्यश्री रमेश मरगळे
आशा अंकुश पासलकर :
१ फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून
१ फॉर्म भारतीय जनता पार्टी कडून
वेल्हे गण
या गणासाठी आतापर्यंत केवळ एकच अर्ज दाखल झाल्याचे समोर आले आहे.
सुवर्णा हेमंत राजीवडे यांचा एकमेव फॉर्म दाखल
—
निवडणुकीची रंगत वाढली
राजगड तालुक्यातील अनेक गट-गणांमध्ये प्रमुख पक्षांनी ताकदवान उमेदवार मैदानात उतरवले असून काही ठिकाणी अपक्ष उमेदवारही प्रभावीपणे लढत देणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या दिवसांत आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता असून तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यांमध्ये अर्ज छाननी, माघारी व अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर राजगड तालुक्यातील खरी लढत स्पष्ट होणार आहे.







