आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

खेड-शिवापूर, खानापूर गटातून सौ. शिवानीताई अनिरुद्ध यादव भाजपाच्या इच्छुकांच्या यादीत अग्रस्थानी!​ आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांच्या सहकार्याने मतदारसंघाच्या विकासात अमूल्य योगदान; ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण.


 

  • ​पानशेत वार्ताहर दि ०९ : समीर कांबळे

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड-शिवापूर – खानापूर गटातून भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) इच्छुकांच्या यादीत माजी पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव यांच्या पत्नी सौ. शिवानीताई अनिरुद्ध यादव यांचे नाव अग्रस्थानी आहे. ‘मिशन २०२५’ च्या तयारीसाठी यादव कुटुंबीयांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, अनिरुद्ध यादव यांच्या गेल्या पाच वर्षांतील (२०१७ ते २०२२) विकासात्मक कार्याची पावती म्हणून सौ. शिवानीताई अनिरुद्ध यादव यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

६० कोटींच्या विकासकामांची नोंद

​माजी पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव यांच्या कार्यकाळात मतदारसंघात सुमारे ६० कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांच्या माध्यमातून हा सर्व निधी उपलब्ध झाला, ज्यामुळे मतदारसंघाच्या विकासात अनिरुद्ध यादव यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.

​मुख्य विकासकामांचा आढावा

​महामार्ग व रस्ते: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक महत्त्वाचे रस्ते पूर्ण करण्यात आले. विशेषतः आर्वी, गाऊडदरा, कल्याण, सिंहगड आणि मोरदारी येथील मुख्य रस्ते दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात आले.

​वस्ती सुधार: घेरासिंहगड धनगरवस्ती व रामोशीवस्ती, तसेच कल्याण धनगरवस्ती येथील रस्त्यांसाठी आमदार तापकीर यांच्या प्रयत्नातून विशेष निधी आणण्यात आला असून कामे सुरू झाली आहेत.

​सामुदायिक योगदान: अवसरेनगर येथे सार्वजनिक विहिरीसाठी अनिरुद्ध यादव यांनी स्वतःच्या मालकीची दोन गुंठे जागा विनमोबदला देऊन विकासकामासाठी मोठे योगदान दिले आहे.

​शिवगंगा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य

​राजकीय कामासोबतच, अनिरुद्ध यादव यांच्या अध्यक्षतेखालील शिवगंगा प्रतिष्ठान सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय असते. मतदारसंघातील विकासकामांची मजबूत पार्श्वभूमी आणि जनमाणसात असलेले स्थान यामुळे, सौ. शिवानीताई यादव यांना उमेदवारी मिळाल्यास, गटातील विकासाचा हा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!