आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

शेतकरी पुत्र सुधीर शेडगे यांची नसरापूर गणातून पंचायत समिती उमेदवारीसाठी जोरदार दावेदारी!


भोर नसरापूर विलास धोंगडे: नसरापूर गणातून आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे शेतकरी पुत्र सुधीर वामन शेडगे यांनी अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली आहे. गेली दहा वर्षे भाजपा संघटनेत सक्रियपणे कार्यरत असलेले शेडगे यांनी पक्षासाठी तसेच जनतेसाठी अनेक पातळ्यांवर काम केले असून, त्यांचा स्थानिक पातळीवर चांगला जनसंपर्क आणि प्रभाव आहे.

सुधीर शेडगे हे नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) येथील रहिवासी असून त्यांनी B.A. पदवी घेतल्यानंतर शेती व बांधकाम व्यवसाय (शेडगे पाटील सप्लायर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन) क्षेत्रात आपले कार्यक्षेत्र निर्माण केले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी नसरापूर ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम पाहिले, तर गणेश विकास कार्य सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी लोकहिताचे निर्णय घेतले.

भाजप संघटनेत त्यांनी तालुका कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून काम करताना अनेक विकासकामांना चालना दिली आहे. याशिवाय त्यांनी गुंजवणी पाणी संघर्ष समितीमध्ये मा. आमदार संग्राम थोपटे आणि बाळासाहेब गरुड यांच्या सोबत काम करत शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सक्रिय सहभाग नोंदवला.

नसरापूर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सुधीर शेडगे यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. गावातील विकास, शेती, शिक्षण, आणि पाणीप्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची चर्चा सर्वत्र होत आहे.

स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार, नसरापूर गणातून आता इच्छुक उमेदवार मैदानात उतरत असताना सुधीर शेडगे यांची उमेदवारी सर्वात मजबूत आणि जनाधार असलेली मानली जात आहे. त्यांच्या माध्यमातून भाजपा पक्षाला नसरापूर गणात एक सक्षम, तरुण, आणि जनसंपर्कात पारंगत नेतृत्व मिळेल, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!