प्रतिनिधी सागर जगदाळे इंदापूर
दि. 4 डिसेंबर 2025 शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने रौप्यमहोत्सवी 2025-26 ऊस गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रति टन तब्बल रु. 3101 इतकी उच्चांकी उचल जाहीर केली आहे. ही रक्कम शुक्रवार (दि. 5) रोजी सर्व ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात विना कपात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांनी दिली.
कारखान्याच्या इतिहासातील विक्रमी उचल — शेतकरी आनंदित
कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या दराने उचल जाहीर करण्यात आली.
या निर्णयाचे शेतकरीवर्गाकडून जोरदार स्वागत झाले असून कारखान्याच्या व्यवस्थापनावर विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त करण्यात आली.
एका दिवसात 6400 MT गाळप — नवा विक्रम!
चालू हंगामात कारखाना उत्कृष्ट गतीने सुरु असून,
मंगळवारी (दि. 2) एकाच दिवशी 6400 मेट्रिक टन ऊस गाळप करून कारखान्याने विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला.
चालू 25 व्या गळीत हंगामात 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे कारखान्याची जोरदार वाटचाल आहे.
आर्थिक अडचणींच्या काळातही शेतकऱ्यांचा विचार — सौ. पाटील
कारखान्याला सध्या आर्थिक दडपण असतानाही “शेतकऱ्यांचे हित प्रथम” या तत्त्वावरच निर्णय घेतल्याचे सौ. भाग्यश्री पाटील यांनी स्पष्ट केले.
बुधवार (दि. 3) अखेरचे उत्पादन:
गाळप: 2 लाख मेट्रिक टन
साखर पोती उत्पादन: 1,45,300 क्विंटल
आजचा साखर उतारा: 10.70%
सरासरी साखर उतारा: 10.00%
गाळप क्षमता: प्रतिदिन 3500 MT
सध्या प्रत्यक्ष गाळप: 5700–5900 MT
सहवीज प्रकल्पातून वीज निर्यात: 72,30,041 युनिट
इथेनॉल उत्पादन: 16,90,100 लिटर
बायोगॅस, सेंद्रिय खत आदी उपप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून, कारखाना बहुविध उत्पादनक्षमतेने मजबूत उभा राहत आहे.
“गुणवत्तापूर्ण ऊस द्या, चांगला दर देणे शक्य” — सौ. पाटील
शेतकऱ्यांना आवाहन करताना सौ. पाटील म्हणाल्या,
“गळीत हंगाम जोरात सुरू आहे. गुणवत्तेचा सर्व ऊस गळीतास दिल्यास दर आणखी सक्षम देणे शक्य होते.”
उपस्थित मान्यवर
या प्रसंगी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचे
“विना कपात रु. 3101 प्रमाणे रक्कम शुक्रवारी खात्यात जमा” — सौ. भाग्यश्री पाटील
नीरा-भीमा कारखान्यास 15 नोव्हेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांची रक्कम पूर्ण, विना कपात शुक्रवार (दि. 5) रोजी बँकेत जमा होणार आहे.










