आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

हिंदवी स्वराज्याचे वारसदार उद्योजक उत्तमबाप्पु शिळीमकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव


 

हिंदवी स्वराज्याचे कुशल संघटक सरदार हैबतराव शिळीमकर यांचे थेट वंशज, ८४ गाव गुंजन मावळचे वतनदार, गारवा गृपचे कार्यकारी व्यवस्थापक तसेच श्री म्हातोबा देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त उत्तमबाप्पु शिळीमकर (शिक्केकरी) यांचा वाढदिवस विविध सामाजिक, धार्मिक व ग्रामस्थ संघटनांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

 

उत्तमबाप्पु शिळीमकर यांनी उद्योजकतेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण विकास, देवस्थान व्यवस्थापन आणि युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गारवा गृपने रोजगारनिर्मितीला चालना दिली असून, श्री म्हातोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि सामाजिक उपक्रमांना बळ दिले आहे.

 

वाढदिवसानिमित्त राजा म्हातोबा चरणी उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त करताना, त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे आणि समाजहितासाठीच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

 

या प्रसंगी पुढील संस्थांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या—

 

सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

 

श्री संदीप काका शिळीमकर युवा मंच

 

समस्त ग्रामस्थ मंडळ, कुरुंगवडी

 

श्री म्हातोबा व कुरुंजाई सेवा तरुण मंडळ, कुरुंगवडी

 

 

समाज, उद्योग आणि संस्कृती यांचा समन्वय साधत कार्यरत असलेल्या उत्तमबाप्पु शिळीमकर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!