आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ड्रिमलॅन्डची बाजी राजगड तालुक्यातील पाच प्रकल्पांची जिल्हास्तरावर निवड


राजगड (प्रतिनिधी : विनोद रणखांबे)

 

पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती राजगड तसेच श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नसरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नसरापूर येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात राजगड तालुक्यातील विश्व फाऊंडेशनच्या ड्रिमलॅन्ड इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय यश संपादन केले. या प्रदर्शनातून राजगड तालुक्यातील एकूण पाच प्रकल्पांची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आली आहे.

 

या विज्ञान प्रदर्शनात भोर व राजगड तालुक्यातील एकूण १३६ प्रकल्प सादर करण्यात आले होते. विविध गटांतील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपली कल्पकता व संशोधन क्षमता सादर केली.

 

मालवली येथील ड्रिमलॅन्ड इंग्लिश स्कूलमधील कु. काव्यांजली दीपक कोडीतकर हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. कु. रिद्धी श्रीराम भोसले हिने निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. काव्यांजली दीपक कोडीतकर व कु. रिद्धी श्रीराम भोसले या दोघींनी संयुक्तिकरित्या प्रथम क्रमांक मिळविला. याच शाळेतील शिक्षक शुभम नंदकुमार सरपाले यांनी राजगड तालुका माध्यमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला.

 

राजगड तालुका विज्ञान प्रदर्शन निकाल पुढीलप्रमाणे :

प्राथमिक गट (इयत्ता सहावी ते आठवी) – तन्वी धरपाळे (तानाजी मालुसरे विद्यालय, दापोडे), आर्यन रेणसे (राजगड विद्यालय, वाजेघर), सुजल शिंदे (राजेशिवछत्रपती विद्यालय, सोंडे).

माध्यमिक गट (इयत्ता नववी ते बारावी) – प्रसेनजीत माने (तोरणा विद्यालय, वेल्हे), आयुष कोडीतकर (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर), वैभव पवार (मातोश्री सोनाबाई देडगे विद्यालय, रुळे).

प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रकल्प – शुभम सरपाले (ड्रिमलॅन्ड इंग्लिश स्कूल, मालवली), सौ. एस. डी. भोसले (प्राथमिक शाळा, निगडे बुद्रुक).

माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रकल्प – बी. डी. रासकर (राजेशिवछत्रपती विद्यालय, सोंडे), एन. जे. माळी (न्यू इंग्लिश स्कूल, पासली).

परिचर उपकरण प्रकल्प – एस. आर. सोंडकर (राजेशिवछत्रपती विद्यालय, सोंडे), एस. एम. गरड (न्यू इंग्लिश स्कूल, पासली).

 

यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी राजगड तालुका शिक्षण विस्तार अधिकारी शकील मुल्ला, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शंकर नाक्ती, प्राचार्य सुभाष वाल्हेकर, प्राचार्य भगवान बेल्हेकर, प्राचार्य मोहन किन्हाळे, प्राचार्या तृप्ती शिळीमकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष दसवडकर, संचालिका सुप्रिया दसवडकर तसेच प्राचार्या तृप्ती शिळीमकर आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ड्रिमलॅन्ड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात राजगड तालुक्याचा गौरव वाढला आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!