आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

पुणे जिल्हा दक्षिण किसान मोर्चा सरचिटणीसपदी दिनानाथ मारणे यांची निवड


 प्रतिनिधी सागर जगदाळे, भिगवण 

 

दि. ०५ — भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) भाजपा किसान मोर्चाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. जिल्हा समन्वयक आमदार राहुल कुल आणि जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या मान्यतेनुसार ही निवड करण्यात आली.

 

दिनानाथ पर्वती मारणे हे तक्रारवाडी गावचे रहिवासी असून गेले 18 वर्षे भारतीय जनता पार्टीत सक्रिय काम करत आहेत. त्यांनी कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव अशी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कामगार आघाडीच्या कार्यात त्यांनी 500 कामगारांची नोंदणी करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

ते मारणे प्रतिष्ठान, नांदगावचे संस्थापक अध्यक्ष असून रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय अशा सामाजिक उपक्रमांतून ते सातत्याने समाजकार्यात योगदान देत आहेत. गोरगरीब आणि वंचितांसाठी मदत करण्याचे कार्य ते नियमितपणे करतात.

 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथस्तरावरील संघटना मजबूत करून पक्षाची कामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ते कटिबद्ध राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

 

ही निवड राहुल कुल, शेखर वढणे, प्रवीण माने, वासुदेव काळे आणि दिग्विजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!