आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

हॉटेल प्लाझोमध्ये खंडणीप्रकरणाची तक्रार; संस्थेची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप


हवेली तालुक्यातील खेड शिवापुर येथील हॉटेल प्लाझोमध्ये चालणाऱ्या प्रतिक्षा मनोरंजन प्लेइंग कार्ड क्लब संस्थेकडून खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, यासंदर्भात फिर्यादी विजय दत्तात्रय अडागळे (वय ३५, रा. माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) यांनी राजगड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात संदीप हनुमंत रासकर याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संशयित आरोपीने संस्थेविषयी खोटी माहिती प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर प्रसिद्ध करणार असल्याची धमकी दिली. तसेच संस्थेत अवैध जुगार चालतो अशी खोटी बातमी पसरवून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

 

तसेच संशयित आरोपीने संस्थेविरोधात खोट्या तक्रारी दाखल करून लोकांना उपोषणाला बसवून वातावरण बिघडवण्याची धमकी दिली. या धमक्यांच्या प्रभावाखाली फिर्यादीकडून खंडणी म्हणून एकूण ८० हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यापैकी ४० हजार रुपये ऑनलाईन आणि ४० हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्याची नोंद तक्रारीत आहे. उरलेले २० हजार रुपये न दिल्यास संस्थेची मोठ्या प्रमाणावर बदनामी करणार असल्याचे संशयित आरोपीने पुन्हा सांगितल्याचेही फिर्यादीने पोलिसांना कळवले.

 

या धमकीप्रकरणामुळे संबंधित संस्थेत तसेच खेड शिवापुर परिसरात चिंता आणि चर्चा निर्माण झाली असून, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान संशयित आरोपीने नेमक्या कोणत्या माध्यमातून धमक्या दिल्या, आर्थिक व्यवहार कसे झाले, तसेच परिसरात कोणत्याही प्रकारचे उपोषण किंवा दिशाभूल करणारी मोहीम राबवण्याचा प्रयत्न झाला होता का, याचा शोध घेतला जात आहे.

 

या प्रकरणी पुढील तपास

दाखल अंमलदार पोहवा अडवाल,

तपास अधिकारी पोसई पाटील

तसेच प्रभारी अधिकारी पोनि गवळी

यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!