आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

राजगड तालुक्यात भाजपा’ पर्व! – समाजकार्यातून राजकारणाकडे: तरुण तडफदार अजिंक्य पोळेकर जिल्हा परिषदेसाठी इच्छुक, आजी फुलाबाई पोळेकर पंचायत समितीच्या रिंगणात!


विंझर प्रतिनिधी समीर कांबळे

गेली ८-९ वर्षे राजगड (वेल्हा) तालुक्यात, विशेषतः पानशेत, वरसगाव आणि गुंजवणी धरणभागात आपल्या सातत्यपूर्ण आणि निःस्वार्थ समाजकार्यातून जनमानसात स्थान मिळवलेले भाजपचे युवा नेते अजिंक्य दत्तात्रय पोळेकर आता सक्रिय राजकारणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. पोळेकर यांनी जिल्हा परिषदेच्या विंझर-पानशेत गटातून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली असून, त्यांचे नाव भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत अग्रस्थानी चर्चेत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या आजी आणि माणगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच फुलाबाई मारुती पोळेकर (निवंगुने) ह्या देखील पंचायत समितीसाठी पानशेत गणातून इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे राजगडच्या राजकारणात ‘पोळेकर’ कुटुंबाचे पर्व सुरू झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

​ ‘पोळेकर’ यांचा सामाजिक कार्याचा धडाका: ‘कोविड योद्धा’ ते ‘जनसेवक’

​अजिंक्य पोळेकर यांनी गेली अनेक वर्षे केवळ दिखाव्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने जनसेवा केली आहे. त्यांच्या कामाची दखल विशेषतः खालीलप्रमाणे घेतली जाते:

​कोविड काळातील अतुलनीय कार्य: कोरोना महासाथीच्या कठीण काळात त्यांनी भाजी वाटप केले, गरजू नागरिकांना रुग्णालयात दाखल करून घेतले आणि मदतीचा हात दिला. ‘अल्बम 30′ सारख्या उपक्रमातून त्यांनी अनेक तरुणांना सामाजिक कामात जोडले.

​मूलभूत सुविधांसाठी संघर्ष: तालुक्यातील वाड्यावस्त्यांवरील वीज, पाणी आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांची सोय केली.

​वंचित घटकांना मदत: अनेक महिलांना रेशनिंग (धान्य) कार्ड मिळवून दिले, तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवले. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीसारख्या राष्ट्रीय सणांना मुलांना खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

​’पोळेकर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य’ च्या माध्यमातून ते आपले सामाजिक कार्य आजही अविरतपणे चालू ठेवत आहेत.

​ राजकीय मैदानात तगडे आव्हान!

​अजिंक्य पोळेकर हे भाजप राजगड तालुक्याचे सक्रिय सदस्य आहेत आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या विंझर-पानशेत गटातून उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर, त्यांची आजी आणि माजी सरपंच फुलाबाई पोळेकर या पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत.

​माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवण्याची इच्छा पोळेकर यांनी व्यक्त केल्याने, हा गट आता चर्चेत आला आहे. भाजपच्या २६ इच्छुकांच्या नावानंतर या दोन तगड्या उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाल्याने, या निवडणुकीत खळबळ माजली आहे. समाजकार्याची मोठी पार्श्वभूमी असलेले पोळेकर कुटुंबाचे हे आव्हान विरोधकांना सोपे नसेल, असे राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

(​”*गेली अनेक वर्षे नागरिकांची सेवा केली आहे. आता राजकारणाच्या माध्यमातून अधिक गतीने आणि प्रभावीपणे विकासकामे करण्याची संधी मिळेल. जनतेचा विश्वास हाच माझा पाठिंबा आहे.” – अजिंक्य दत्तात्रय पोळेकर (इच्छुक, जिल्हा परिषद*)

​राजगड (वेल्हा) तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा हा ‘पोळेकर’ कुटुंबाचा उदय, विंझर-पानशेत गटातील निवडणूक अत्यंत चुरशीची करणार हे निश्चित!


  • 👍
104
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!