आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर वनपरिक्षेत्रात पक्षी सप्ताह साजरा : पिसावरे येथे पक्षी निरीक्षण उपक्रमात ३२ प्रजातींची नोंद


 

भोर (प्रतिनिधी) : तबरेज खान

प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली आणि मराठी साहित्यातील निसर्गप्रेमी लेखक मारुती चितमपल्ली यांच्या जयंतीनिमित्त देशभरात दरवर्षी ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान “पक्षी सप्ताह” साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर भोर वनपरिक्षेत्रात ६ नोव्हेंबर रोजी विशेष पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

हा उपक्रम वनविभाग भोर आणि बार्न ऑऊल बर्डिंग पक्षी निरीक्षण टीम, पिसावरे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. सकाळी ६.३० ते १०.३० या वेळेत पिसावरे गाव परिसरात झालेल्या या निरीक्षण मोहिमेत तब्बल ३२ विविध पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली.

 

विविध पक्षी प्रजातींचे दर्शन

 

निरीक्षणादरम्यान स्थलांतरीत पक्ष्यांसह पिसावरे गावाजवळील पाणथळ भागातील, जंगल परिसरातील तसेच माळरानावरील पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. या मोहिमेत किंगफिशर, मुनिया, ब्लॅक ड्रोंगो, बुलबुल, टेलरबर्ड, ईग्रेट, वॉर्बलर, सनबर्ड, स्पॅरो, बाभळीचा टिटवी यांसारख्या पक्ष्यांची नोंद झाली. यामुळे परिसरातील जैवविविधतेचा उत्तम परावर्त दाखवणारे हे निरीक्षण ठरले.

 

पक्षी ओळख व मार्गदर्शन

 

पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी नागरिकांना पक्षी ओळख, त्यांच्या अधिवासाचे महत्त्व, पर्यावरणीय संतुलनातील त्यांची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात पक्षी निरीक्षक अनिकेत साप्ते, सुरज अडसूळ, रविषा बरदाडे आणि ज्ञानेश्वर बरदाडे यांनी आपले अनुभव व ज्ञान सहभागींसोबत शेअर केले.

 

वनविभागाचे मार्गदर्शन

 

कार्यक्रमाचे नियोजन व देखरेख सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड व वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वनपाल सुग्रीव मुंढे तसेच भोर वनपरिक्षेत्रातील सर्व वनरक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी वनपाल रोहन इंगवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

पक्षी संवर्धनासाठी जनजागृती

 

या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांमध्ये पक्षीसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिसावरे परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्ती व पक्ष्यांचे संरक्षण हे स्थानिकांसाठी अभिमानाचा विषय असून भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!