आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व निरलॉन फाउंडेशनच्या माध्यमातून राजगड तालुक्यात विद्यार्थ्यांना सायकल वाटप


वेल्हा प्रतिनिधी : दिनेश गायकवाड 

राजगड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व निरलॉन फाउंडेशन ट्रस्ट, मुंबई यांच्या माध्यमातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) राजगड तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष शंकरनाना भुरूक यांच्या विशेष प्रयत्नातून सायकल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

 

शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी राजगड तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्ष कार्यालय येथे पार पडला. श्रीनिवास ढाणे, तहसीलदार, यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत तोरणा विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स विंझर, श्री शिवाजी वीर बाजी पासलकर हायस्कूल पानशेत, श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंबावणे तसेच श्री शिवाजी वीर बाजी पासलकर हायस्कूल भाग शाळा कोंडगाव येथील विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा सुलभ व्हावी आणि शिक्षणातील गळती कमी व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

कार्यक्रमास युवा नेते पै. गोरक्षशेठ भुरूक, सरचिटणीस प्रदीप मरळ, महिला अध्यक्षा सुवर्णा राजिवडे भुरूक, पानशेत विभाग अध्यक्ष संपतशेठ मोरे, ओबीसी अध्यक्ष लक्ष्मण तावरे, विद्यार्थी अध्यक्ष हनुमंत कार्ले, सरपंच सिता खुळे, माजी सरपंच संतोष मोरे, सरपंच विलास पवार, डॉ. चिंधे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल कोळपे तसेच राजगड तालुका प्रतिनिधी दिनेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या सामाजिक उपक्रमाबद्दल पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत, अशा शैक्षणिक सहाय्यक योजना भविष्यातही सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!