आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

युथ क्रीडा राष्ट्रीय स्पर्धेत भोर तालुक्याची सुवर्णयशस्वी कामगिरी नसरापूर येथे सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा भव्य सत्कार


भोर तालुक्यातील युथ क्रीडा राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी नसरापूर येथे उत्साहात पार पडला. हा सत्कार समारंभ मा. आमदार संग्राम दादा थोपटे यांच्या हस्ते पार पडला.

दिनांक ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी शासकीय जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे युथ गेम कौन्सिलिंग ऑफ इंडिया व भारतीय युवा खेल परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत देशभरातील १४ राज्यांतील ३८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

या राष्ट्रीय स्पर्धेत भोर तालुक्यातील ९ खेळाडूंनी विविध वयोगट व वजनगटात सुवर्णपदके पटकावत भोर तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्वल केले आहे.

सुवर्णपदक विजेते खेळाडू

मुले :

कुणाल गोळे, अथर्व चव्हाण, शिवेंद्र गायकवाड

मुली :

पूर्वा मेमाने, मनस्वी गिऱ्हे, परिणीता डिंबळे, कृष्णल शेटे, प्रांजल ओंबळे, सृष्टी

या खेळाडूंच्या उल्लेखनीय यशाबद्दल मा. आमदार संग्राम दादा थोपटे यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत असल्याने भोर तालुक्याचा नावलौकिक वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सत्कार समारंभाला लहू नाना शेलार, पोपट नाना सुके, आदित्य बोरगे, राकेश गाडे, विलास धेंडे, नसरापूर सरपंच उषा कदम, इरफान मुलाणी, संदीप कदम, सुधीर वाल्हेकर, गणेश कदम, ज्ञानेश्वर झोरे, सुनील कदम, सुभाष गोळे, बबन मेमाणे, संदीप गिऱ्हे, पितांबर शेटे, तनिष्का व्यासपीठ, वैशाली झोरे, स्मिता विभुते तसेच अनिता गोळे, नीता कटके आदी मान्यवर उपस्थित होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे हे सर्व सुवर्णपदक विजेते खेळाडू युनिक तायक्वांदो फाउंडेशन, नसरापूर येथे नियमित प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षक जितेंद्र भगत सर व निलम निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सराव सुरू आहे. प्रशिक्षकांच्या मेहनतीमुळेच खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर यश मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या यशामुळे भोर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून भविष्यात आणखी खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!