प्रतिनिधी : विलास धोंगडे नसरापुर
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथे पार पडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धेत पोर्णिमा कांबळे हिने ५७ किलो वजन गटात अव्वल कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला . स्मृती बुडे हिने ७६ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांक मिळवला. काजल गायकर हिने ४७ किलो वजन गटात द्वितीय क्रमांकाची बाजी मारली, तर सायली उबाळे हिने त्याच वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला. सर्व चारही खेळाडूंनी प्रभावी प्रदर्शन करीत महाविद्यालयाच्या क्रीडा पॉवरलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील यशात भर घातली.
या यशाबद्दल संस्थेचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. पौर्णिमा कारळे, प्राध्यापक वृंद तसेच सर्व प्रशासकीय कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी सर्वांनी विद्यार्थिनींना शुभेच्छाही दिल्या.
ग्रामीण भागातील भेलके महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सादर केलेली ही कामगिरी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या दृष्टीने अभिमानास्पद ठरली आहे मागील दोन वर्ष हे महाविद्यालय पॉवर लिफ्टिंग मुली या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप घेत आहे










