आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीकडून पुतळ्याच्या परिसराचे भव्य सजावट आणि सुशोभीकरण​ गाव पातळीवर महामानवाला अभिवादन; सरपंच सीताताई खुळे यांच्यासह मान्यवरांचा पुढाकार


प्रतिनिधी समीर कांबळे विंझर

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायत व वेल्हे पंचायत समिती परिसर एका वेगळ्या उत्साहाने आणि आदराने न्हाऊन निघाला. ग्रामपंचायत वेल्हे बुद्रुकच्या वतीने पंचायत समिती परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संपूर्ण परिसराचे अत्यंत देखणे आणि आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले.

​या विशेष सजावटीच्या कामासाठी ग्रुप ग्रामपंचायत वेल्हे बुद्रुकच्या सरपंच सीताताई नंदकुमार खुळे यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामपंचायत लिपिक अजिंक्य गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) युवक अध्यक्ष प्रदीप कांबळे, कैलास कदम तसेच सुनील वेगरे आणि पप्पू सुतार यांनी विशेष संयोजन करून हे काम पूर्ण केले.

संयोजन आणि सजावट:

यावेळी पुतळ्याच्या चबुतऱ्यासह संपूर्ण परिसरात मनमोहक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. या सुंदर सजावटीमुळे महामानवाला आदराने अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एक प्रेरणादायी आणि शांततामय वातावरण तयार झाले आहे.

 

​ उपस्थितांकडून कौतुक:

वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या या उत्कृष्ट कामाबद्दल आणि पुतळ्याच्या परिसराच्या सुशोभीकरणाबद्दल वेल्ह्यातील नागरिक, विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच सीताताई खुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक कौतुक केले आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!