आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत खेड शिवापूर टोल नाक्यावर जनजागृती


 

रस्ता सुरक्षा अभियान २०२६च्या अनुषंगाने शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी महामार्ग पोलीस केंद्र सारोळा यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील खेड शिवापूर टोल नाका येथे वाहतूक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक विजय गुरव, पोलीस उपनिरीक्षक साखरे तसेच महामार्ग पोलीस केंद्र सारोळा येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

वाहन चालविताना दुचाकीस्वारांनी हेल्मेट व चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये, चालक परवाना व वाहनाची कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावीत, दारू अथवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवू नये, वेगमर्यादेचे पालन करावे, ट्रिपल सीट वाहन चालवू नये, गावांतून महामार्गावर ये-जा करताना व महामार्ग ओलांडताना वाहतूक पाहून सुरक्षितपणे रस्ता ओलांडावा, तसेच महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तत्काळ मदत करावी, अशी माहिती देण्यात आली. याशिवाय १०३३, १०८ व ११२ या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकांचीही माहिती वाहनचालकांना देण्यात आली.

 

तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), टोल प्रशासन व महामार्ग पोलीस केंद्र सारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट परिधान करून वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमात टोल कर्मचारी अभिजित गायकवाड व शर्मा हेही उपस्थित होते.

 

या जनजागृती कार्यक्रमामुळे वाहनचालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढली असून, महामार्गावरील अपघात कमी करण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!