आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

कोयत्याने हल्ला करून तरुणास जखमी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथे जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश रामसेवक यादव (वय २२, रा. माउली पार्क सोसायटी, शिंदेवाडी, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२:१५ वाजण्याच्या सुमारास माउली पार्क सोसायटीजवळील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली.

 

फिर्यादी यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन करून “वाद मिटवूया” असे सांगत खाली बोलावण्यात आले. त्यानंतर ते आपल्या भावासह घटनास्थळी गेले असता तेथे वरूण शिंदे (पूर्ण नाव माहित नाही) व त्याच्यासोबत दोन अनोळखी इसम उपस्थित होते. यामध्ये आरोपींनी प्रथम फिर्यादीची ओळख पटवून घेतली. त्यानंतर वरूण शिंदे याने पॅन्टमध्ये लपवून ठेवलेला कोयता काढून यादव यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर वार केला.

 

त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून फिर्यादी व त्यांच्या भावास लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे.


  • 👍

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

108
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

error: Content is protected !!