आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर बस स्थानकात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिलेला अटक दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले


भोर प्रतिनिधी : तबरेज खान

भोर : भोर बस स्थानकात प्रवासासाठी चढत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिला चोरट्यास भोर पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक केली. मंगळवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी ही घटना घडली असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आंबाडे (कोळेवाडी), ता. भोर येथील एक वयोवृद्ध महिला भोर–स्वारगेट एसटी बसने पुण्याकडे जाण्यासाठी भोर बस स्थानकात बसमध्ये चढत होती. याच वेळी गर्दीचा फायदा घेत करिष्मा करण सकट (रा. सायगाव, ता. उदगीर, जि. लातूर) या महिला चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे, अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळ काढला.

काही वेळानंतर आपल्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने तात्काळ आपला मुलगा भरत शिवराम रांजणे (रा. कोळेवाडी, ता. भोर) यांना माहिती दिली. भरत रांजणे यांनी त्वरित भोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलिसांनी तातडीने हालचाली करत बस स्थानक परिसरात सापळा रचला. पोलीस कर्मचारी धर्मवीर खांडे, हेमंत भिलारे, वर्षा भोसले, अतुल मोरे तसेच स्थानिक तरुण आकाश सागळे आणि जावेद आतार यांनी संयुक्तपणे संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. अखेर मांढरदेवीकडे जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी वाहनात बसलेल्या महिला चोरट्यास ताब्यात घेण्यात आले.

 

ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत संबंधित महिलेनं चोरीची कबुली दिली असून दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी गजबजलेल्या परिसरात घडलेल्या चोरीचा अवघ्या एका तासात छडा लावण्यात आल्याने भोर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!