आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोंगवलीत महिला सक्षमीकरणाचा भव्य सोहळा; गणेश निगडे यांच्या पुढाकाराने उत्साहाची लाट


भोंगवली गणात महिला सक्षमीकरणाला समर्पित “सन्मान मातृशक्तीचा – होम मिनिस्टर व भव्य लकी डॉ स्पर्धा” हा उपक्रम प्रचंड उत्साहात पार पडला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश तात्या निगडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या भव्य सोहळ्याला ३,५०० ते ४,००० महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. महिलांच्या प्रबोधनाला आणि त्यांच्या सामाजिक योगदानाला मंच देणारा हा कार्यक्रम संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला.

 

महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर तसेच घर–समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले. खेळ, प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संवादात्मक फेऱ्यांमुळे सर्व वयोगटातील महिलांनी आनंदाचा अनुभव घेतला. महिलांना आत्मविश्वास, अभिव्यक्तीचा आत्मसन्मान आणि सामुदायिक नेतृत्वाची प्रेरणा मिळावी, हा कार्यक्रमाचा उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाला.

 

कार्यक्रमातील आकर्षण ठरलेल्या लकी डॉ स्पर्धेत प्रमुख बक्षिसांचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले.

प्रथम क्रमांकावर सुनंदा विकास थिटे यांना स्कूटी,

द्वितीय क्रमांकावर रुपाली भोसले यांना फ्रिज,

तृतीय क्रमांकावर छाया सोनवणे यांना वॉशिंग मशीन

तर किशोरी नितीन साळुंके (ओव्हन), संगीता रिठे (टीव्ही) व प्रणाली कारळे (मिक्सर) यांना सन्मानित करण्यात आले.

 

विशेष म्हणजे, भोर–राजगड–मुळशीचे आमदार शंकर मांडेकर हे स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते स्कूटीचे बक्षीस प्रदान करण्यात आले. आमदारांमुळे कार्यक्रमाचा उत्साह अधिक वाढला. त्यांनी महिलांचे कौतुक करत समाजाच्या विकासात महिलांची भूमिका निर्णायक असल्याचे सांगितले आणि अशा उपक्रमांना सातत्याने साथ देण्याचे आवाहन केले.

 

गणेश निगडे यांच्या नेतृत्व व व्यवस्थापनामुळे हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. पूर्व भागातील बुलंद नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे निगडे हे लोकांच्या सुखदुःखात सदैव तत्पर राहणारे, मदतीसाठी सदैव पुढे येणारे आणि जनतेच्या मनात कायमचा विश्वास निर्माण करणारे प्रतिनिधी आहेत. महिलांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

कार्यक्रमात भालचंद्र जगताप, रणजीत शिवतारे, संतोष घोरपडे, चंद्रकांत बाठे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. युवा मंचाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा सहयोगही लक्षणीय ठरला.

 

महिला सबलीकरणाच्या या भव्य उपक्रमाने भोंगवली परिसरात उत्साह, सकारात्मकतेची नवी लाट निर्माण करत आगामी काळातही अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांची अपेक्षा वाढवली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेत वाढत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता गणेश निगडे यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, हे स्पष्टपणे जाणवत आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!