आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

बँकेलगतच चोरट्यांची धाडसी कारवाई! भोरमध्ये सलून फोडून ५५ हजारांची रोकड लंपास


भोर | प्रतिनिधी – तबरेज खान

 

भोर शहरातील चौपाटी–मंगळवार पेठ मार्गावरील चौपाटी वेताळ पेठ परिसरात गुरुवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास चोरीची घटना घडून आली. बँकेच्या शेजारीच असलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या युनिक सलून या दुकानाचे शटर व कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ५५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

या घटनेप्रकरणी सलूनचे मालक विशाल अशोक शिर्के (रा. खानापूर, ता. भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्रीच्या शांततेचा फायदा घेत चोरट्याने सलूनमधील गल्ला व लॉकर फोडून त्यामधील रोख रक्कम लंपास केली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

दरम्यान, याच परिसरात मागील वर्षी थंडीच्या दिवसांत रात्रीच्या वेळी तीन घरे फोडून सुमारे १५ लाखांचे दागिने आणि २ लाख रुपयांची रोकड चोरण्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाचा तपास भोर पोलिसांनी अल्पावधीत लावल्यामुळे, याही चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

 

शहरातील गजबजलेल्या व महत्त्वाच्या मार्गावरील इमारतीत चोरी झाल्याने भोर शहरातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धर्मवीर खांडे करीत आहेत.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!