आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

माजी विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम इन्फोसिसच्या सहकार्याने शाळेला ३० संगणक संच व इंटरॲक्टिव पॅनेल भेट


भोर | प्रतिनिधी विक्रम शिंदे 

भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण घेतलेल्या १९९५ ते २०१५ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबवला. पुणे येथील Infosys कंपनीच्या सहकार्याने विद्यालयास ३० संगणक संच तसेच परस्परसंवादी (इंटरॲक्टिव) पॅनेल भेट देण्यात आले.

 

विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक एस. बी. रणवरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी विद्यार्थी एकनाथ इवरे, तानाजी वाल्हेकर, नितीन पारठे, हॉटेल व्यावसायिक गणेश आवाळे, नितीन किंद्रे, सूरज आवाळे, वैशाली शिंदे, सचिन मोरे, अंकुश मालुसरे आदींनी समाजमाध्यमांद्वारे एक समूह तयार केला. सुरुवातीला ‘जमेल तशी मदत’ या भावनेतून सुरू झालेल्या या प्रयत्नांना सेवानिवृत्त शिक्षक सिकंदर रणवरे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. त्यानंतर इन्फोसिसच्या ‘स्पर्श हीलिंग टच’ सीएसआर युनिटच्या माध्यमातून संगणक संच व इंटरॲक्टिव पॅनेलची भेट शक्य झाली.

संगणक संच व इंटरॲक्टिव पॅनेल प्रदान सोहळा दि. २० रोजी विद्यालयातील आप्पासाहेब गुप्ते वकील सभागृहात उत्साहात पार पडला. या वेळी भोर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मधुकर पैठणकर, सचिव डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. प्रदीप पाटील, सुरेश शाह, प्राचार्य लक्ष्मण भांगे, तसेच इन्फोसिसचे अभिजीत देशपांडे उपस्थित होते. ‘स्पर्श हीलिंग टच’तर्फे अपूर्वा पाटील, प्रनोती पाटील, केवल धनवट, वत्सला धवलकर, संकेत धूळकर, तरुणीबाला खुमनथम, मिलिंद इंगुळकर यांची उपस्थिती लाभली.

 

कार्यक्रमाला उपप्राचार्य वसंत गायकवाड, प्रा. सोमनाथ कुंभार, प्रा. विक्रम शिंदे, प्रा. दुधगावकर (एस. आर.), केशव पवळे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. विक्रम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. सोमनाथ कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले.

 

या उपक्रमामुळे विद्यालयातील डिजिटल शिक्षणाला मोठी चालना मिळणार असून, माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपून दाखविल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!