आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी


भोर आणि राजगड तालुक्यात ताडी विक्रीच्या वाढत्या व्यवसायावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित विभागांनी तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वेल्हा-राजगड परिसरात नुकत्याच घडलेल्या अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर या घटनेचा संबंध ताडीच्या नशेशी असल्याच्या चर्चा स्थानिक स्तरावर होत आहेत. या पार्श्वभूमीवर ताडी विक्री केंद्रांची तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

भोर व राजगड तालुक्यात सुरू असलेली ताडी विक्री केंद्रे वैध आहेत की अवैध, त्यांच्याकडे आवश्यक परवाने आहेत का, तसेच विक्री होणारी ताडी नैसर्गिक आहे की भेसळयुक्त, याची चौकशी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे करावी, अशी मागणी होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, काही ठिकाणी ताडीच्या नावाखाली भेसळयुक्त आणि आरोग्यास घातक पदार्थांची विक्री होत असल्याची शंका आहे. त्यामुळे ताडीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून गुणवत्ता पडताळावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. विशेषतः शाळा-कॉलेज परिसरातील युवक व्यसनाच्या आहारी जाऊ नयेत, यासाठी अशा विक्री केंद्रांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जर कोणतेही बेकायदेशीर प्रकार आढळले तर संबंधितांवर तातडीने कारवाई करावी आणि भोर-राजगड तालुक्यात सुरू असलेल्या ताडी विक्री केंद्रांची व्यापक तपासणी मोहीम राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.


  • 👍

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

error: Content is protected !!