आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

हळदीवरून परतताना मधमाशांचा हल्ला नवरा-नवरीसह ९ जण जखमी; वेल्हे ग्रामीण रुग्णालयात उपचार


 

राजगड : राजगड तालुक्यातील घिसर गावात लग्नपूर्व हळदी समारंभ आटोपून परत येत असताना मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यात नवरा-नवरीसह नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घिसर येथील संकेत शिंदे व संध्याराणी धिडले यांचा विवाह सोहळा आज पार पडणार असून त्याआधी गावातील जुगाई देवी मंदिरात पारंपरिक हळदी समारंभ पार पडला. सकाळी सुमारे दहा वाजता नवरा-नवरी व नातेवाईक मंदिरात गेले होते. विधी पूर्ण करून सर्वजण पायवाटेने परतत असताना जंगल परिसरातील झुडपांमध्ये असलेल्या मधमाशांनी अचानक हल्ला चढवला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी सैरावैरा पळ काढला. या घटनेत सुमारे वीस ते पंचवीस जणांच्या समूहावर मधमाशांनी झडप घातली. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या नऊ जणांना लग्नासाठी आलेल्या वाहनांमधून तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती पोलीस पाटील सुनील धिडले यांनी दिली.

 

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींमध्ये सहा पुरुष व तीन महिलांचा समावेश असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आवश्यक उपचार करून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोईटे यांनी सांगितले.


  • 👍

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

108
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

error: Content is protected !!