आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

खानापूर केंद्रात पेन देऊन दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत महात्मा गांधी विद्यालयात उत्साहाचे वातावरण; ३७९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित


खानापूर प्रतिनिधी : शशिकांत जाधव

खानापूर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षेचे केंद्र असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत श्री काळभैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने पेनचे वाटप करून परीक्षार्थींना प्रोत्साहन देण्यात आले.

 

या स्वागत उपक्रमावेळी केंद्रप्रमुख शिवराम साबळे, दक्षता समितीचे सदस्य तसेच श्री काळभैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक रघुनाथ यादव, उपाध्यक्ष कै. नंदकुमार जावळकर, संचालक बाबासाहेब शिंदे, माजी विद्यार्थी संघाचे सल्लागार व सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत जाधव तसेच पोलीस पाटील गणेश सपकाळ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पेन देऊन त्यांच्या उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

यावेळी बोलताना रघुनाथ यादव यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा देत आपल्या विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लावून गाव व शाळेचा गौरव वाढवावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे आणि परीक्षेची भीती दूर व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

खानापूर केंद्रावर खानापूर, पानशेत, डोणजे, मालखेड, रुळे, खामगाव, गिरीनगर व सांगरुन परिसरातील विविध शाळांमधील एकूण ३७९ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. परीक्षा शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात सुरू असल्याची माहिती केंद्रप्रमुख शिवराम साबळे यांनी दिली.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!