खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व भारताचे माजी कृषीमंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विज्ञान, चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रदर्शनाचे उद्घाटन खानापूरचे माजी सरपंच शरद जावळकर, खडकवासला युवक राष्ट्रवादी काँग्रेस (ग्रामीण)चे अध्यक्ष शशीकांत किवळे, माजी विद्यार्थी लक्ष्मण माताळे, संस्था अधिक्षक सिताराम अभंग, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद जाधव, गो-हे केंद्र प्रमुख बांदल मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य शिवराम साबळे, माजी शिक्षक शशिकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान, चित्रकला व रांगोळीच्या माध्यमातून वैज्ञानिक, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विषयांची अत्यंत अभ्यासपूर्ण व सर्जनशील मांडणी केली होती. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व कष्टाचे सर्व उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक करत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन केले. शरदचंद्रजी पवार यांनी देशाच्या विकासासाठी व कृषी क्षेत्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
प्रदर्शनास संजय जावळकर (माजी पंचायत समिती सदस्य), मारुती किंडरे, रघुनाथ यादव, नलावडे सर (संस्था कार्यालय), गर्जे सर (संस्था कार्यालय) यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
या प्रदर्शनाचे आयोजन व नियोजन प्राचार्य शिवराम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान मदने, नूतन ओतुरकर, अपर्णा आढाव, सुजाता भोसले, डॉ. कीर्ती जाधव, मीरा कदम, विजय सुरवसे, भीमाजी हिंगे, सोमनाथ जाधव, रमेश कोळी, शीतल सुकाळे, मानसी मोरे, नीलम सुरवसे, संजय थोरवे, राणी धावडे, लोणकर, मोकाशी, मोरे, भापकर, ज्येष्ठ लेखनिक रायबा कुंभार, अशोक जावळकर, ग्रंथपाल उज्ज्वला शिंदे तसेच प्रकाश रोकडे, संतोष पंडीत, रुपाली जावळकर आदी शिक्षक-शिक्षकेत्तर सहकारी व विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक केले. प्रदर्शनाचे फलकलेखन अपर्णा आढाव यांनी केले.
एकूणच या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाल्याने हे प्रदर्शन शैक्षणिकदृष्ट्या प्रेरणादायी ठरले, अशी भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.










