पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर मौजे केळवडे (ता. भोर) गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. ६ नोव्हेंबर) रात्री साडेअकरा वाजता झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मृत तरुणाचे नाव शशिकांत राजेंद्र हेलोडे (वय ३२, मुळ रा. खामगाव, जि. बुलढाणा) असे असून, तो रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हेलोडे हे रात्री रस्ता ओलांडत असताना पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालक घटनास्थळावर थांबला असून, स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोहवा राणे हे करत आहेत.
Views: 527










